नाशिक – नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. आज साहित्य संमेलनाचा आजचा अखेरचा दिवस. आज दुपारी ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक गिरीश कुबेर यांच्या अंगावर शाई फेकल्याची घटना घडली.
दरम्यान, आज दुपारी गिरीश कुबेर यांच्या उपस्थितीत दुपारी दीड वाजता वृत्तपत्रांचे मनोरंजनीकरण अशा विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी जात असताना कुबेर यांच्यावर शाई फेकल्याचा प्रकार घडला.
गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात छत्रपती संभाजीराजे यांची बदनामी करण्यात आल्याचा आरोप या संघटनांनी केली आहे. त्यामुळे कुबेरांनी महाराष्ट्राची माफी मागवी आणि राज्य सरकारने तातडीने या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी या संघटनांनी केली आहे.