Ranbir Kapoor | Animal Movie : अभिनेता रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ चित्रपट रिलीज होण्याआधीच त्याची बरीच चर्चा होती. रणबीरला पहिल्यांदाच धमाकेदार गँगस्टर अवतारात पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. टीझर-ट्रेलरवरूनच चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करणार अशी शक्यता वर्तवली जात होती आणि तसेच झालं.
या चित्रपटाने ऍडव्हान्स बुकिंगचाही रेकॉर्ड तोडला. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवसापासूनच चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात झाली. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अॅनिमल’ने रणबीर कपूरला अशा शैलीत पडद्यावर आणले आहे जे आजपर्यंत दुसरा कोणताही चित्रपट करू शकला नाही.
‘ॲनिमल’ सिनेमासाठी अभिनेता रणबीर कपूर याने 35 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. तर तृप्ती हिने 40 लाख रुपये मानधन घेतलं असल्याचं सांगण्यात येत. या सिनेमातील सगळीच गाणे आणि अॅक्शन सीन लोकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. त्यामुळेच चित्रपटाने तिकीट वारीवर जोरदार कमाईचा आकडा पार केला.
मात्र, अश्यातच हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच कारण देखील तितकंच महत्वाचं आहे. ते म्हणजे या चित्रपटातील डिलीट करण्यात आलेले सीन आहेत. संदीप रेड्डी वांगानं ‘अॅनिमल’ या चित्रपटातून काही सीन्स डिलीट केले होते.
त्यातील एक सीन हा सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. सगळ्यांनी चित्रपटाच्या शेवटी क्लायमॅक्स सीन हा पाहिलाच असेल ज्यात रणबीर हा बॉबी देओलची फाईट असते. त्या फाईटमध्ये बॉबी त्याचा जीव गमावतो. त्यानंतरचा एक सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या या सीनला पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले की हा शेवटचा सीन चित्रपटात का दिसला नाही. यात रणबीर कपूर नशेत फ्लाइट कॉकपिटमध्ये जाण्याआधी आणखी एक ड्रिंक बनवतो. त्यानंतर तो कॉकपिटमध्ये असलेल्या पायलटच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्याला सीटवरून उठायला सांगतो.
not gonna forgive @imvangasandeep anna for removing this scene in the movie, it’s a pure display of Ranbir showing his silence and agony after k*lling his brother, especially that lifting off at the end 🙏#RanbirKapoor pic.twitter.com/XDl0TMjjgL
— 𝙑 ♪ (@RKs_Tilllast) August 7, 2024
त्यानंतर पायलटच्या सीटवर बसलेला रणबीरच्या तोंडात सिगारेट असल्याचं दिसतं. या संपूर्ण सीनमध्ये एकही डायलॉग नाही तर भावना सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी बॅकग्राऊंडला ‘पापा मेरी जान’ हे गाणं लावण्यात आलं आहे.
खरंतर या संपूर्ण सीनमध्ये भावाला मारून आल्यानंतर रणबीरची जी परिस्थीती झाली त्याला किती दु:ख होतं आहे याविषयी स्पष्ट दिसून येत आहे. आता नेटकरी हा व्हिडिओपाहून काहीसे नाराज झाले आहेत आणि यावर कमेंट करताना दिसत आहे.