सासूरवाडीत जावायाला बेदम मारहाण

शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे नवरा-बायकोच्या वादातून बायको माहेरी गेलेली असताना बायकोला समजावून सांगत तिला आणण्यासाठी गेलेल्या पतीला सासरच्या लोकांनी बेदम मारहाण केली.

याप्रकरणी याबाबत नवनाथ ज्ञानेश्‍वर भुजबळ (रा. पांढरी वस्ती, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. रवींद्र भगवान गायकवाड, भगवान गायकवाड, सचिन आचारी, आशा भुजबळ (रा. तळेगाव ढमढेरे) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

पांढरे वस्ती येथे राहणारे नवनाथ भुजबळ व पत्नी आशा भुजबळ यांच्यात वाद झाला असल्यामुळे आशा ही एक महिन्यापासून नांदत नाही. ती आई वडिलांकडे राहत असल्यामुळे नवनाथ भुजबळ हे पत्नी व सासू, सासरे राहत असलेल्या आरंभ सोसायटी तळेगाव ढमढेरे या ठिकाणी गेले. त्यावेळी नवनाथ पत्नी आशाला समजावून सांगत होता. त्यांना आशा उलटे बोलू लागली. यावेळी नवनाथ यांनी पत्नीला तुला यायचे नसेल तर नको येऊ म्हणाले. त्यावेळी सर्वांनी त्यांना मारहाण केली. तसेच जावयाचा पाठलाग करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.