नवी दिल्ली – दिल्लीत एका युवकाने केलेल्या गोळीबारात जखमी झालेला जामिया मिलीया विद्यापीठाचा विद्यार्थी शहादाब फारूख याला आज रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी त्याला एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दिल्लीतील गोळीबारात हा विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती त्याच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्याचे वडिल काश्मीरातून त्याला नेण्यासाठी दिल्लीत आले होते. तथापी त्याने काश्मीरला परत जाण्याऐवजी विद्यापीठातल्याच वसतीगृहात राहण्याचे ठरवले आहे.
काल त्याच्यावर तेथे एक शस्त्रक्रीया करण्यात आली. तो या विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन शाखेचा विद्यार्थी आहे. दिल्लीत एका निदर्शकाने ये लो आझादी म्हणत याच्यावर गोळीबार केला होता. त्याने झाडलेली गोळी त्याच्या डाव्या हाताला लागली होती. त्यानंतर त्याला तातडीने एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.