मुंबई – वेस्ट इंडिजचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कॅरन पोलार्ड याला दुखापत झाल्याने त्याच्या इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलार्ड सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत असून त्याने मंगळवारी झालेल्या दुखापतीमुळे या स्पर्धेतीन माघार घेतली आहे. आता आयपीएल स्पर्धेपूर्वी तो तंदुरुस्त ठरेल का हा प्रश्न मुंबई इंडियन्ससमोर पडला आहे. पोलार्ड पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी किती काळ लागेल याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही.
? Kieron Pollard ruled out of #HBLPSLV. More ? https://t.co/8f2gB3ki6O pic.twitter.com/6s3AzpQk25
— PakistanSuperLeague (@thePSLt20) March 7, 2020
दरम्यान, चीनसह जवळपास 80 देशांत करोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाला आहे. भारतातही याचे रुग्ण आढळले आहेत, त्या पार्श्वभूमीवर यंदा होत असलेली इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) ठरल्याप्रमाणे होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाच्या राज्यातील वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मुंबईत कॅबिनेटची बैठक पार पडली.
या बैठकीत आयपीएल स्पर्धेला सरकारने हिरवा कंदिल दिला आहे. पण स्पर्धा ही प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात यावी, अशी अट राज्य सरकारने घातली आहे. तर, बीसीसीआयकडून आयोजनातील बदलासंदर्भात कोणतीही पुष्टी झालेली नाही.