व्हेनेझुएलाच्या तुरुंगात हिंसाचारात 29 कैदी ठार

कराकास (व्हेनेझुएला) – व्हेनेझुएलाच्या पश्‍चिमेकडील अकारिग्युआ येथील तुरुंगामध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये किमान 29 कैदी ठार झाले आहेत. या हिंसाचारात 19 पोलिस देखील जखमी झाले आहेत. तुरुंग फोडून पळून जाण्याचा प्रयत्न कैद्यांनी केला होता.मात्र हा कट उघड झाल्यामुळे पोलिसांच्या विशेष दलांनी तुरुंगात कारवाई केली. त्यावेळी झालेल्या हिंसाचारात 29 कैदी ठार झाले, असे पोर्तुगालच्या सार्वजनिक सुरक्षा विभागाच्या सचिवांनी सांगितले. तुरुंगात झालेल्या हिंसाचारादरम्यान गोळीबार आणि हातबॉम्बचे 3 स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आल्याचे काही कैद्यांनी सांगितले.

कैद्यांसाठी काम करण्याऱ्या एका स्वयंसेवी संघटनेने दिलेल्या माहितीनुसार या हिंसाचारात 25 जण मरण पावले आहेत. पळून जाण्याच्याच्या प्रयत्नात प्राण नावाच्या कैद्यांमधील म्होरक्‍याने काही कैद्यांन ओलीस ठेवले होते. त्यांच्या सुटकेसाठी पोलिसांचे विशेष दल तुरुंगात पाचारण करण्यात आले होते. या विशेष दलाने ओलीस ठेवलेल्या कैद्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केल्यावर हिंसाचार भडकला. या हिंसेत विल्फ्रेडो रामोस नावाचा कैद्यांमधील अन्य म्होरक्‍याही मारला गेला. यावेळी स्फोटकांचे स्फोट आणि काही धारदार शस्त्रांमुळे पोलिसही जखमी झाले.

व्हेनेझुएलामध्ये तुरुंगांमध्ये सुविधांचा अभाव असल्याने हिंसाचार होणे ही नित्याची बाब आहे. एकूण 8 हजार क्षमतेच्या तुरुंगांमध्ये 55 हजार कैद्यांना ठेवण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.