प्रत्येक गावातील पायाभूत सुविधा हाच विकासाचा मंत्र

पंतप्रधानांच्या हस्ते बिहारमधील 9 महामार्गांची कोनशिला

नवी दिल्ली – देशातील प्रत्येक गावाला शहराप्रमाणेच सुविधा मिळाव्यात यासाठी आपले सरकार प्रथमपासूनच प्रयत्नशील असून पायाभूत सुविधा निर्मितीसाठी सातत्याने मोठी तरतूद करण्यात येत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

ज्या देशातील लहानमोठ्या गावांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास झालेला असतो तोच देश खऱ्या अर्थाने प्रगती करतो, हेच इतिहासातून वारंवार दिसून आले आहे. म्हणूनच विविध प्रकल्पांद्वारे रस्ते, महामार्ग, इंटरनेट सुविधा यांद्वारे गावं जोडण्याचं महत्त्वपूर्ण काम केले जात असल्याचे मोदी यांनी सांगितले. 

मोदी यांच्या हस्ते आज बिहार राज्यातल्या 14 हजार 258 कोटी रुपये खर्चाच्या महत्त्वाकांक्षी नऊ महामार्ग प्रकल्पांचा कोनशिला अनावरण समारंभ दुरदृश्‍य प्रणालीद्वारे झाले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, मुख्यमंत्री नितीशकुमार यामध्ये सहभागी झाले होते. 

या महामार्गांमुळे रस्ते वाहतूक आणि मालवाहतुकीची सुविधामध्ये सुधारणा होईल. या कार्यक्रमात तीन मोठ्या पुलांचे उद्घाटन आणि ऑपटीकल फायबर इंटरनेट सेवेचही उद्घाटन करण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.