इन्फोसिस, विप्रो कंपन्यांच्या नफ्यात वाढ

बंगळुरू – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस आणि विप्रो या कंपन्यांनी दुसऱ्या तिमाहीचे आपले ताळेबंद जाहीर केले. त्यामध्ये नफ्यात वाढ झाल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे.

भारतातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची माहिती-तंत्रज्ञान कंपनी असलेल्या इन्फोसिस कंपनीच नफा दुसऱ्या तिमाहीत 11.9 टक्‍क्‍यांनी वाढून 5,421 कोटी रुपये इतका झाला आहे. या कंपनीचा महसूल 20.5 टक्‍क्‍यानी वाढून 29,602 कोटी रुपये इतका झाला आहे.

आगामी काळामध्ये महसूल 17.5 टक्‍क्‍यांपर्यंत वाढेल असे कंपनीला वाटते. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलिल पारेख यांनी सांगितले की, आता करोनाचे निर्बंध कमी झाल्यामुळे आगामी काळामध्ये कंपनीच्या ऑर्डरमध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. कंपनीने प्रति शेअर 15 रुपये एवढा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे

विप्रो कंपनीला दुसऱ्या तिमाहीत झालेला ढोबळ नफा 17 टक्‍क्‍यांनी वाढून 2,930 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीला 2,484 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीचा महसूल 30 टक्‍क्‍यांनी वाढून 19,667 कोटी रुपये इतका झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.