नवी दिल्ली -इन्फोसिस या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने बाय बॅकच्या शक्यतेवर विचार चालू असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात 14 एप्रिल रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत विचार केला जाणार असल्याचे कंपनीने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे.
बाजार नियंत्रक सेबीच्या नियमानुसार बायबॅक करण्याच्या शक्यतेवर संचालक मंडळ विचार करणार असल्याचे कंपनीने शेअर बाजाराला सादर केलेल्या माहितीत म्हटले आहे. 14 एप्रिल रोजी बैठक झाल्यानंतर जो निर्णय होईल तो शेअर बाजारांना कळविण्यात येणार आहे.
31 मार्च रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीचा ताळेबंद जाहीर करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक 13 आणि 14 एप्रिल रोजी होणार आहे. ऑगस्ट 2019 मध्ये इन्फोसिस कंपनीने 11.05 कोटी शेअरचे बायबॅक केले होते. यासाठी कंपनीने 8,260 कोटी रुपयांचा खर्च केला होता. डिसेंबर 2017 मध्ये ही कंपनीन 13,000 कोटी रुपयांच्या शअरचे बायबॅक केले होते.