नवी दिल्ली -कंपनीच्या कामकाजात आणि विकासात कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी इन्फोसिस कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना पाच कोटी शेअर उपलब्ध करणार आहे.
भागधारकांची या निर्णयाला मंजुरी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे इन्फोसिस कंपनीने म्हटले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांनाही दहा कोटी रुपयाचे शेअर देण्यात येतील.