इन्फोसिसचे 9,200 कोटींचे बायबॅक

कंपनीकडून प्रती शेअर 15 रुपयांचा लाभांश

बंगळुरू -इन्फोसिस ही सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनी 9,200 कोटीच्या शेअरची फेरखरेदी करणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याचे कंपनीने शेअर बाजाराला सादर केलेल्या माहितीत म्हटले आहे.

कंपनीने जारी केलेल्या माहितीनुसार कंपनी एकूण शेअरच्या 1.23 टक्के म्हणजे 5.25 कोटी शेअर1,750 रुपये प्रति शेअर या भावाने खरेदी करणार आहे. हा 25.2 टक्के इतका प्रीमियम भरतो. बायबॅक करण्याची कंपनीची ही तिसरी वेळ आहे. याअगोदर 2017 आणि 2019 मध्ये कंपनीने शेअरचे बायबॅक केले होते. मंगळवारी कंपनीच्या शेअरचा भाव दोन टक्‍क्‍यांनी कमी झाला होता. त्यानंतर कंपनीने बाय बॅकच्या शक्‍यतेवर विचार केला जाणार असल्याचे सांगितले होते. लॉकडाऊनच्या काळात इतर क्षेत्रावर परिणाम झाला असला तरी माहिती तंत्रान क्षेत्रावर फारसा परिणाम झालेला नाही.

नफ्यात साडेसतरा टक्‍के वाढ
संचालक मंडळाच्या बैठकीनंतर इन्फोसिस कंपनीने ताळेबंद जाहीर केला. चौथ्या तिमाहीत कंपनीचा नफा 17.5 टक्‍क्‍यांनी वाढून 5,076 कोटी रुपये इतका झाला आहे. कंपनीचा महसूल 13.1 टक्‍क्‍यांनी वाढून 26,311 कोटी रुपये इतका झाला आहे. आगामी काळात महसूल 12 ते 14 टक्‍क्‍यांनी वाढेल असे कंपनीला वाटते. कंपनीने 15 रुपयाचा अंतिम लाभांश जाहीर केला असून यासाठी कंपनीला 6,400 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.