मुंबई – सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात त्याच्या कुटुंबियांकडून प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात बिहार पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपासासाठी बिहार पोलीस सध्या मुंबईत दाखल झालेत. अशातच रिया चक्रवर्ती हिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी चौकशीबाबत माहिती दिली आहे.
ते म्हणतात, “मुंबई पोलिसांकडून रिया चक्रवर्ती यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. रिया यांनी पोलीस तपासाला योग्य सहकार्य देखील केलंय. मात्र रिया यांना बिहार पोलिसांकडून अद्याप कोणतंही नोटीस वा समन्स प्राप्त झालेलं नाही. या प्रकरणाचा तपास करणं बिहार पोलिसांच्या कार्यक्षेत्रातही येत नाही.”
Rhea Chakraborty’s statement has been recorded by Mumbai Police. She has cooperated with Police. Till today no notice/summon has been received by her from Bihar Police & they’ve no jurisdiction to investigate: Satish Maneshinde, Rhea Chakraborty’s lawyer. #SushantSinghRajputDeath
— ANI (@ANI) August 3, 2020
तत्पूर्वी, अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर अवघा देश हादरला होता. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील कथित घराणेशाहीमुळेच त्याला हे टोकाचे पाऊल उचलावे लागले अशा प्रतिक्रिया उमटत होत्या. अशातच सुशांतचे वडील के के सिंह यांनी, सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत बिहार पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
बिहार पोलीस सध्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झाले असून त्यांना मुंबई पोलिसांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याचा आरोप होतोय. बिहार येथून आलेल्या एका आयपीएस अधिकाऱ्याला होम क्वारंटाईन करण्यात आल्याने वातावरण तापलं असून याप्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.