पुरपरिस्थितीचा दुध, भाजीपाल्यांवर परिणाम

मुंबईत 13 लाख लिटर दुधाची आवक घटली

नवी मुंबई : पश्‍चिम महाराष्ट्रातील पुरपरिस्थितीचा मोठा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि उपनगरात झाल्याचे दिसत आहे. मुंबईमध्ये भाजीपाल्याची मागणीपेक्षा आवक कमी होत असून, किरकोळ मार्केटमध्ये बाजारभाव प्रचंड वाढले आहेत.

एवढेच नाही तर मुंबईसह आजूबाजूच्या उपनगरातील भागात आज आणि पुढच्या दोन तीन दिवसांत दुधाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवणार आहे. कारण या भागात कोल्हापूर, सातारा आणि सांगली या भागातून येणारे तब्बल 15 लाख लिटर दुधाची आवक या पुरामुळे घटली आहे. नाशिक, पुणे व गुजरातवरून येणाऱ्या मालावर मुंबई आणि उपनगरातील नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे. यामुळेच भाजीपाल्याचे दर वाढत आहेत. पावसामुळे किरकोळ विक्रेत्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. भाजीपाला भिजल्यामुळे खराब होत असल्याने विक्रेत्यांना नुकसान होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.