Finance Minister Nirmala Sitharaman | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 23 जुलै रोजी मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहे. या अर्थसंकल्पाबाबत सर्व प्रकारचे अटकळ बांधले जात आहे. सर्वसामान्यांपासून ते विद्यार्थी, शेतकरी, करदाते आणि उद्योगपतींना या अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत. त्यानुसार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत बजेट सादर करण्यास सुरूवात केली आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेत वेगाने वाढ
संसदेत त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या की, “भारतातील जनतेनं पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. ऐतिहासिक तिसऱ्यांदा त्यांची पुन्हा निवड झाली आहे. कठीण काळातही भारताची अर्थव्यवस्था दमदार कामगिरी केली आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे.” याशिवाय भारतात महागाई नियंत्रणात असून हा अर्थसंकल्प गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यावर केंद्रित असल्याचे देखील त्यांनी म्हंटले आहे.
अर्थसंकल्पात तरुणांसाठी २ लाख कोटी रुपयांची तरतूद
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थ संकल्प मांडत असताना त्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात गरीब, महिला, तरुण आणि अन्न पुरवणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे म्हटले आहे त्यामुळे भारतात महागाई नियंत्रणात आहे. हा अर्थसंकल्प गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यावर केंद्रित आहे. तसेच रोजगार वाढविण्यावर सरकारचा भर असून अर्थसंकल्पात तरुणांसाठी २ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
दरम्यान, सीतारामन यांनी सलग सहा अर्थसंकल्प सादर केले आहेत, ज्यात या वर्षी फेब्रुवारीमध्ये अंतरिम अर्थसंकल्प आहे. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी (एप्रिल, 2024 ते मार्च 2025) पूर्ण अर्थसंकल्प हा त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प असेल. 1959 ते 1964 दरम्यान सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करणाऱ्या देसाईंचा विक्रम त्यांनी मागे टाकला आहे.