नवी दिल्ली : देशातील महागाईविरोधात काँग्रेसने देशभर आंदोलन सुरू केले आहेत. दिल्लीतही काँग्रेसकडून महागाईविरोधात आंदोलनादरम्यान,पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ताब्यात घेतले. राहुल गांधी काँग्रेस खासदारांसह संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत पदयात्रा काढत होते. मात्र पोलिसांनी त्यांना विजय चौकातच रोखले आणि राहुलसह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी प्रियांका गांधी यांनादेखील ताब्यात घेतले यावेळी पोलिसांनी त्यांना ओढत फरफटत नेल्याचे दिसत आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. महागाईमुळे लोकांचे खूप हाल होत आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबाबत सरकारने काही उपाय केले पाहिजे. महागाईविरोधात आम्ही ही लढाई लढत असल्याचे प्रियंका गांधी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही भाजपावर हल्लाबोल केला आहे.
#WATCH | Police detain Congress leader Priyanka Gandhi Vadra from outside AICC HQ in Delhi where she had joined other leaders and workers of the party in the protest against unemployment and inflation.
The party called a nationwide protest today. pic.twitter.com/JTnWrrAT9T
— ANI (@ANI) August 5, 2022
आमच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आमच्या खासदारांसोबत गैरवर्तन केले, त्यांना ओढले. काहींना यावेळी पोलिसांनी मारहाणदेखील केली. लोकशाहीची हत्या होत असल्याचे तुम्ही सर्व पाहत आहात. महागाईविरोधात आम्ही आंदोलन करत आहोत, पण केंद्र सरकार आम्हाला आंदोलन करू देत नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
दरम्यान, महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन सुरू आहे. सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचे सर्वच नेते निषेध नोंदवण्यासाठी काळे कपडे घालून आंदोलनात सहभागी झाले आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या की, ‘देशातील महागाई अनियंत्रित झाली आहे. याबाबत सरकारने काही उपाय केले पाहिजे. महागाईविरोधात आम्ही ही लढाई लढत आहोत.’ त्याचवेळी काँग्रेस नेते पी चिदंबरम म्हणाले की, ‘हा विरोध महागाई आणि अग्निपथबाबत आहे. महागाईचा फटका सर्वांनाच बसला आहे. राजकीय पक्ष असल्याने जनतेचा आवाज बुलंद करणे हे आमचे कर्तव्य आहे, त्यामुळे आम्ही आंदोलन करत आहोत.