बलवर्धक , कंठसुधारक ज्येष्ठमध

योगिता जगदाळे
ज्येष्ठमध हे एक आयुर्वेदिक औषध आहे. त्याला यष्टीमधू असेही म्हटले जाते. ज्येष्ठमध एक वनौषधी असून त्याचे झाड साधारण पाच ते सहा फूट उंचीचे असते. ज्येष्ठमधाच्या काड्या या चवीने गोड असतात. त्याचा उपयोग स्वयंपाक घरातील मसाल्यामध्येही केला जातो.

आयुर्वेदात ज्येष्ठमधाचे महत्त्व विषद करण्यात आले आहे. सुश्रुत, अष्टांग हृदय, चरक संहिता सारख्या अतिप्राचीन ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. शुध्द हरपणे, पोटदुखी, दमा आदी आजारांवर ज्येष्ठमध गुणकारी आहे. ओल्या ज्येष्ठमधामध्ये पन्नास टक्के पाणी असते. ते सुकवल्यायानंतर केवळ दहा टक्के उरते. ज्येष्ठमधात ग्लिसराइजिक ऍसिडचे प्रमाण असल्याने त्याची चव साखरेपेक्षाही गोड असते.

संगीत शिकणाऱ्यासाठी ज्येष्ठमध कंठ सुधारक म्हणून उपयोग करते. अशक्तपणा कमी करणारे म्हणजे शक्तिवर्धक असे हे ज्येष्ठमध चवीला गोडसर, पण कफ कमी करणारे बलवर्धक औषध आहे. रुग्णास अशक्तपणा आला असल्यास ज्येष्ठमधाचा तुकडा बारीक कुटून त्याचे वस्त्रगाळ चूर्ण, मध व तुपातून दुपारी व रात्री जेवणापूर्वी त्यास खाण्यास द्यावे. गॅस्ट्रिक अल्सर तसेच लहान आतड्यामध्ये होणाऱ्या ड्यूओडनल अल्सरवरही ज्येष्ठमध हे लाभदायी ठरत असते.
घसा खराब झाला किंवा खोकला येत असला, तर ज्येष्ठमध चघळण्यास किंवा त्याचे चूर्ण मधासोबत घेण्यास सांगितले जात असले, तरी याशिवायही ज्येष्ठमधाचे अनेक फायदे आहेत. चवीला गोड असणारे ज्येष्ठमध कॅल्शियम, ग्लीसारायजक ऍसिड, अँटी ऑक्‍सिडंटस्‌, अँटी बायोटिक तत्वांनी परिपूर्ण आहे. यामध्ये प्रथिनेही आहेत.

ज्येष्ठमधाच्या वापराने डोळ्यांशी निगडित विकार, तोंड येणे, घसा खराब असणे, दम लागणे, हृदयरोग, तसेच जुन्या जखमांच्या उपचारामध्ये अतिशय चांगला गुण येतो. ह्या सर्व विकारांच्या उपचारांमध्ये ज्येष्ठमधाचा वापर गेली अनेक शतके केला जात आहे. ज्येष्ठमध हे वात, कफ, पित्त दोषांना शमवून अनेक रोगांमध्ये रामबाण इलाज म्हणून सिद्ध झालेले आहे. ज्येष्ठमधाच्या काढ्याने डोळे धुतले असता, डोळ्यांशी निगडित विकार दूर होण्यास मदत होते. ज्येष्ठमधाची पूड आणि बडीशेपेची पूड समप्रमाणात घेऊन ती एकत्र करावी. हे मिश्रण दररोज संध्याकाळी एक लहान चमचा घेतल्याने दृष्टिदोष नाहीसे होऊन डोळ्यांची जळजळ थांबते. जर डोळे काही कारणाने सतत लाल होत असतील.

तर ज्येष्ठमध पाण्यामध्ये उगाळून घेऊन त्यामध्ये कापसाचा बोळा भिजवावा, हा बोळा डोळ्यांवर बांधला असता, डोळ्यांची लाली कमी होते. अनेकदा उष्णतेमुळे तोंड येते. तोंडामध्ये लहान लहान फोड येतात आणि त्यामुळे काहीही खाता-पिताना खूप त्रास होतो. अशा वेळी ज्येष्ठमधाच्या लहान तुकड्याला मध लावून हा तुकडा चघळावा. यामुळे तोंडातील फोड निवळतीलच, त्याशिवाय खोकला येत असल्यास किंवा घसा खराब असल्यास त्यातही आराम मिळेल. जर कोरडा खोकला येत असेल, तर ज्येष्ठमध पाण्यामध्ये उगाळून एक चमचा होईल इतपत चाटण तयार करावे. त्यामध्ये थोडे मध घालून हे चाटण

दिवसातून तीन वेळा चाटवावे.
त्वचारोगातही ज्येष्ठमध लाभकारी आहे. त्वचेवर मुरमे, पुटकुळ्या येत असल्यास त्यावर ज्येष्ठमध उगाळून घेऊन त्याचा लेप लावल्याने मुरमे लवकर निघण जातात, व त्यामुळे कोणतेही इन्फेक्‍शन होत नाही. तसेच जुने घाव असतील, तर त्यावर ज्येष्ठमध आणि तीळ एकत्र वाटून घेऊन त्यामध्ये तूप मिसळावे आणि घावावर लेप करावा. त्यामुळे जखमा लवकर भरून येतात.

पोटाचे विकार
ज्येष्ठमधचे मुळचे चूर्ण पोटाच्या विकारांसाठी अत्यंत गुणकारी आहे. पोटात झालेली जखम त्याने लवकर भरून निघते. ज्येष्ठमधचे एक ग्रॅम चूर्ण पाण्यासोबत नियमित सेवन केल्याने स्तन व योनीसंबंधी आजार दूर होऊन त्यांच्यात सेक्‍सविषयी भावना जागृत होत असतात. तसेच स्त्रियांना आपले सौंदर्य अनंत काळापर्यंत टिकवून ठेवता येते.

अल्सर
गॅस्ट्रिक अल्सर व लहान आतड्यांना होणाऱ्या ड्यूओडनल अल्सरवर ज्येष्ठमध हे अत्यंत प्रभावी औषध आहे. इतर औषधांच्या तुलनेत ज्येष्ठमध, अल्सर हा आजार लवकर बरा करत असते.

रक्ताची उलटी
रक्ताची उलटी झालेल्या रुग्णाला दूध किंवा मधासोबत ज्येष्ठमध दिल्याने त्याला आराम पडतो. तसेच उचकी, सर्दी या आजारावर ज्येष्ठमध चूर्ण अधिक गुणकारी आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×