भुज – भारतीय हद्दीत शिरकाव करणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आली. गुजरातमध्ये ती कारवाई सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) केली. संबंधित घटना कच्छ जिल्ह्यात घडली. आंतरराष्ट्रीय सीमेलगत तैनात असणाऱ्या बीएसएफच्या सतर्क जवानांनी वेळीच संशयास्पद हालचाल हेरली.
भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याचे ध्यानात आल्याने जवान सक्रिय झाले. त्यांनी घुसखोराला थांबण्याचा इशारा दिला. मात्र, घुसखोर पुढे सरकत राहिल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशीसाठी त्याला स्थानिक पोलिसांकडे सोपवण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या घुसखोराचे नाव बाबू अली (वय 22) असे आहे. तो पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील रहिवासी आहे. त्याने अनावधानाने घुसखोरी केली की त्याचा कुठला नापाक उद्देश आहे ते चौकशीतून स्पष्ट होईल.