मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘मलायका अरोरा’ राहत असलेल्या इमारतीतही कोरोनाचा शिरकाव झाला असून, संपूर्ण इमारत सील करण्यात आली आहे. याआधीही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने अनेक सेलिब्रिटींच्या इमारती बीएमसीने सील केल्या आहेत.
मलायका वांद्रयातील टस्कनी अपार्टमेंटमध्ये राहते. याच इमारतीत कोरोना रूग्ण आढळला. यानंतर हा संपूर्ण परिसर कंटेन्टमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनमुळे गेले अनेक दिवस मलायका आपल्या घरातच बसून आहे.
View this post on Instagram
The thinker…. #rodin (wondering Wat to do next … can’t sit still )#stayhomestaysafe
काही दिवसांपूर्वी सरकारने अनलॉक केलं. यानंतर देशभरात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होण्यापेक्षा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णात सर्वाधिक वाढ झाल्याचं दिसत आहे.