खटावपाठोपाठ माण तालुक्यात करोनाचा शिरकाव; दिवसभरात चौथा रुग्ण

जिल्ह्यातील रुग्णसंख्या १२३ वर पोहचली….

सातारा (प्रतिनिधी) – खटावपाठोपाठ माण तालुक्यातही मंगळवारी करोनाने शिरकाव केला. अहमदाबाद येथून मूळचा माण तालुक्यातील २५ वर्षीय युवकाचा रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याचे रात्री सव्वानऊ वाजता सांगण्यात आले.

जिल्ह्यात दिवसभरात चार जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता १२३ वर पोहचली आहे. तसेच आतापर्यंत एकही रुग्ण नसलेल्या खटाव व माण तालुक्‍यात करोनाचा शिरकाव झाला आहे. तर कराड तालुक्‍यातील करोनाबाधित रुग्णांच्या संहवासातील दोघे पॉझिटिव्ह आले आहेत.

ठाण्यातून खरशिंगे (ता. खटाव) येथे दुचाकीवरून आईवडिलांना घेऊन आलेला 20 वर्षांचा युवक पॉझिटिव्ह आला आहे. सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात त्या युवकाला दाखल केले होते. करोनाबाधिताच्या निकट सहवासातील व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असणारा 29 वर्षीय पुरुष व 52 वर्षीय पुरूष अशा दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

जिल्ह्यातील १२२ करोनाबाधितांपैकी आता ८६ रुग्ण उपचार घेत आहेत. ३५ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अहमदाबादवरून आलेला एक माण तालुक्यातील रहिवासी असलेला २५ वर्षीय तरुण संस्थात्मक विलगीकरणात होता, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी रात्री उशिरा दिली. आज दिवसभरातला चौथा बाधित रुग्ण आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.