अनेक लोकांच्या श्वासाला दुर्गंध येतो. ते बोलायला लागले की, त्या दुर्गंधीमुळे त्यांचा सहवास नकोसा वाटतो. ही श्वासाच्या दुर्गंधीची समस्या अनेकवेळा दुसऱ्यांसमोर लाजिरवाणे होण्याची वेळ आणते. मागे, ब्रेकफास्ट न करणे, तोंडाची स्वच्छता न करणे, खराब डायजेशन आणि तोंडात लाळेची कमतरता अशा अनेक कारणांनी ही समस्या होऊ शकते. मात्र, ही समस्या दूर करणे फारशी कठीण गोष्ट नाही. खाण्यापिण्यात बदल करून, माऊथ फ्रेशनर्स-मुखवासाचा वापर करून ही समस्या कमी करता येऊ शकते. त्यासाठी काही सोपे उपाय-
- पाणी : दररोज भरपूर प्रमाणात पाणी पिऊन तोंडाची दुर्गंधी दूर केली जाऊ शकते. दिवसातून 7-8 ग्लास पाणी प्या आणि अनेक वेळा कोमट पाण्याने गुळण्या करा. डियायड्रेशनमुळे तोंडात बॅक्टेरिया ऍक्टिव्ह होतात अणि तेच श्वासाच्या दुर्गंधीचे कारण बनतात.
- क जीवनसत्व : आहारात व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा समावेश करा. संत्री, लिंबू, किवी सारखी आंबट फळे तोंडाची दुर्गंधी दूर करण्यात लाभदायक असतात. बॅक्टेरिया दुर्गंधी निर्माण करण्यासाठी जबाबदार बॅक्टेरिया त्यामुऴे नष्ट होतात. सफरचंद कापून न खाता तसेच खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते. त्यामुळे तोंडातील लाळेचे प्रमाण वाढते. लाळेमुळे तोंडाच्या दुर्गंधीला जबाबदार बॅक्टेरिया नष्ट होतात.
- दालचिनी चहा : दालचिनीच्या चहामधील अँटीबॅक्टेरिया तत्त्व तोंडातील बॅड बॅक्टेरियाशी लढण्याचे काम करते. दिवसातून 2-3 वेळा दालचिनीचा चहा घेतला असता श्वासातील दुर्गंधी दूर होण्यास मदत होते
- पुदिना : पुदिन्याचा कूल आणि फ्रेश फ्लेव्हर तोंडातून येणारी दुर्गंधी दूर करण्याचा सर्वात फायदेशीर इलाज आहे. पुदिन्याची पाने कच्ची चावून खावी किंवा डिश आणि ड्रिंकमध्ये मिसळून प्यावी. ती प्रत्येक प्रकारे फायदेशीर असतात.
- लवंग : लवंग ओरल हेल्थला मेंटेन ठेवते. दातांमध्ये वेदना असो किंवा दातांचा पिवळेपणा असो. लवंग चावून दुर्गंधी दूर करता येऊ शकते. लवंग कच्ची खाता येते आणि तिचा भोजनातही वापर करता येतो.
- बडीशेप : जेवणानंतर योग्य डायजेशनसाठी बडीशेप खाण्याची पध्दत फार प्राचीन आहे आणि श्वास डायजेशन हे मोठे कारण असू शकते. बडीसोप खाऊन ही समस्या खूप कमी करता येऊ शकते.
- वेलदोडे : श्वासातील येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी वेलदोडे खाणे हा सुद्धा चांगला पर्याय आहे. वेलदोड्याचा चहा पिणेसुद्धा फायदेशीर असते.