सातारा -कण्हेर (ता. सातारा) येथील 80 वर्षीय दोन वृद्ध महिला करोना बाधित आढळल्या आहेत. कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रात दि. 8 जुलै रोजी संबंधित महिलांची तपासणी केली असता त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी आढळले होते.
त्यातच त्यांना दम्याचा त्रास असल्याने तपासणीसाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले होते. तेथे त्यांचे स्त्राव घेऊन तपासणीसाठी पाठविले असता गुरुवारी रात्री त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
मंगळवारी रात्री एका युवकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या निकटवर्तीयातील या दोन महिला आहेत. महिलांच्या सहवासातील 4 जणांना खावली येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन, तर लो-रिस्कमध्ये आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील 4 कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. कण्हेर येथे आणखी दोन करोनाचे