INDW vs SAW 3rd T20I : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी20 सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. शेवटच्या टी-20 मध्ये भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी हा ‘करो या मरो’ अशा स्थितीचा सामना आहे.
#TeamIndia win the toss and elect to bowl
Follow the Match ▶️ https://t.co/NpEloo68KO#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/xJTHAEhgRJ
— BCCI Women (@BCCIWomen) July 9, 2024
या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना 12 धावांनी जिंकला होता. त्याचवेळी पावसामुळे दुसरा टी-20 रद्द करण्यात आला होता. अशा स्थितीत हरमनप्रीत ब्रिगेड आज दक्षिण आफ्रिकेला हरवून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन : लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ताजमिन ब्रिट्स, मारिझान कॅप, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, ॲनेके बॉश, ॲनी डेर्कसेन, एलिस-मेरी मार्क्स, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको मलाबा.
भारताची प्लेइंग इलेव्हन : शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, उमा छेत्री (यष्टीरक्षक), एस सजना, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, अरुंधती रेड्डी, राधा यादव.