भारतीय महिला संघाची इंग्लंडवर मात, मालिकेत 2-0 ने घेतली विजयी आघाडी

मुंबई – इंग्लंडविरूध्दच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाने फलंदाजी आणि गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करत इंग्लंडचा 7 विकेटने पराभव केला आहे. या विजयासह तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.

इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना 43.3 षटकांत सर्वबाद 161 धावा केल्या होत्या. भारतीय गोलंदाजीत वेगवान गोलंदाज शिखा पांडे आणि झूलन गोस्वामीने प्रत्येकी 4 विकेट घेतल्या. तर पूनम यादवने 2 विकेट घेतल्या.

विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य भारतीय महिला संघाने 3 विकेट गमावत 41.1 षटकांत पूर्ण केले. भारतीय सलामीवीर स्मृति मंधाना हिने पुन्हा एकदा चांगला खेळ करत 63 धावांची खेळी केली. तर पूनम राऊतने 32 धावा करत तिला चांगली साथ दिली. कर्णधार मिताली राज हिने नाबाद 47 आणि दीप्ति शर्माने नाबाद 6 धावा काढत संघास विजय प्राप्त करून दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.