#INDvWI : नाणेफेक जिंकून वेस्टइंडिजचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

चेन्नई : तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात आज (रविवारी) वेस्ट इंडीजविरुद्ध खेळताना सलग दहाव्या द्विपक्षीय मालिका विजयाच्या दिशेने भारत प्रयत्न करेल. तर बलाढ्य भारताचे आव्हान परतवून लावण्यासाठी कॅरेबियन्सही कडवी झुंज देतील, अशी अपेक्षा आहे.

चेन्नईतील एम.ए. चिंदबरम स्टेडियमवर या सामन्यास सुरूवात झाली आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा वेस्टइंडिजच्या बाजूने लागला आहे. कर्णधार कायरन पोलार्डने क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे.

दरम्यान, नुकतीच झालेली टी-२० मालिका भारताने २-१ ने जिंकली. आता एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतही तोच फाॅर्म कायम राखण्याचा प्रयत्न विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.