#INDvWI : नाणेफेक जिंकून वेस्टइंडिजचा गोलंदाजीचा निर्णय

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा निर्णायक सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियम थोड्याच वेळात सुरू होणार आहे. दोन्ही संघांची 1-1 अशी बरोबरी झाली असून आजच्या सामन्यातील विजय मालिका जिंकण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, त्यामुळे दोन्ही संघांसाठी करो या मरो अशीच स्थिती निर्माण झालेली आहे.

तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा वेस्टइंडिजच्या बाजूने लागला असून कर्णधार कायरन पोलार्डने गोलंदाजी स्विकारत भारतीय संघास प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे.

दरम्यान, कर्णधार विराट कोहलीच्या खेळीने भारताने पहिल्या सामन्यात विजय मिळवित मालिकेत आघाडी घेतली, मात्र त्यानंतरच्या दुसऱ्या सामन्यात भारताच्या दिशाहिन गोलंदाजी, सुमार क्षेत्ररक्षण व फलंदाजीतील अपयश वेस्ट इंडिजच्या पथ्यावर पडले व त्यांनी विजयासह मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

Leave A Reply

Your email address will not be published.