मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या तिस-या टी-२० सामन्यात भारतानं विंडीजचा ६७ धावांनी पराभव करत विजय मिळवला. या विजयासह भारतानं ३ सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली.
3rd T20I. It's all over! India won by 67 runs https://t.co/avPB1DydN0 #IndvWI @Paytm
— BCCI (@BCCI) December 11, 2019
भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद २४० धावा केल्या. प्रत्युत्तरात विजयासाठी २४१ धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडिजच्या संघाला २० षटकांत ८ बाद १७३ पर्यंतच मजल मारता आली. वेस्टइंडिजकडून फलंदाजीत कायरन पोलार्डने ३९ चेंडूत ६८ तर शिमरन हेटमायरने २४ चेंडूत ४१ धावांची खेळी केली पण संघाला विजय मिळवून देण्यास ते अपयशी ठरले. या व्यतिरिक्त विडींजच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही आणि विंडीजला पराभवाला सामोरे जाव लागलं.
India win by 67 runs!
Kieron Pollard's 68 wasn't enough in the end, and Deepak Chahar's 2/20 sealed victory for the hosts.#INDvWI | SCORECARD 👇 https://t.co/hzZBfxxDeP pic.twitter.com/wBbGgzFONZ
— ICC (@ICC) December 11, 2019
भारताकडून गोलंदाजीत दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी २ गडी बाद करत महत्वपूर्ण कामगिरी बजावली.
तत्पूर्वी, कर्णधार कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारली. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहूल यांनी तूफान फटकेबाजी करत पहिल्या विकेटसाठी ११.४ षटकांत १३५ धावा जोडल्या. केसरिक विलियम्सने रोहित शर्माला झेलबाद करत ही जोडी फोडली. रोहितने ३४ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारासह ७१ धावा केल्या. त्यापूर्वी रोहितने तिस-या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार ठोकत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ४०० षटकार पूर्ण केले.
तिस-या क्रमांकावर फलंदाजीस आलेला रिषभ पंत पुन्हा अपयशी ठरला, तो शून्यावर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि राहुलने सामन्याची सूत्रे हाती घेत आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी तिस-या विकेटसाठी ९५ धावा जोडत संघाची धावसंख्या २०० पार नेली. त्यानंतर शेल्डन काॅटरेलने राहुलला बाद करत ही जोडी फोडली. राहुलच शतक ९ धावांने हुकले, त्याने ५६ चेंडूत ९ चौकार व ४ षटकारासह ९१ धावा केल्या. तर विराटने २९ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारासह ७० धावा करत संघाची धावसंख्या २० षटकांत २४० पर्यत नेली.
वेस्टइंडिजकडून गोलंदाजीत ख्यारी पिएरे, जेसन होल्डर आणि शेल्डन काॅटरेल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.