#INDvWI : रोहित शर्माची आणखी एका विक्रमाला गवसणी

मुंबई : भारताचा आक्रमक सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने आज वेस्टइंडिजविरूध्दच्या तिस-या टी-२० सामन्यात तिस-या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला आणि याबरोबरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिनही प्रकारात मिळून ४०० षटकार लगावणारा पहिला भारतीय फलंदाज हा विक्रम आपले नावे केला आहे.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक ५३४ षटकारांची नोंद आहे. पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी ४७६ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि आज रोहितने ४०० वा षटकार ठोकत या यादीत तिसरे स्थान पटकावत आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.