मुंबई – वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा बुधवारी बीसीसीआयने केली. प्रमुख खेळाडूंना विश्रांती देताना संघाचे कर्णधारपद सलामीवीर फलंदाज शिखर धवन याच्याकडे सोपवण्यात आले आहे. तसेच संघाचे उपकर्णधारपद अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे देण्यात आले आहे.
या मालिकेसाठी नियमित कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, जसप्रीत बुमराह व यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे. तीनही एकदिवसीय सामने पोर्ट ऑफ स्पेनलाच होणार असून, सोळा खेळाडूंच्या संघात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या अर्शदीप सिंग यालाही संघात कायम ठेवण्यात आले आहे.
टी-20 मालिकेसाठीचा संघ येत्या काही दिवसांत जाहीर केला जाणार आहे. या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पोर्ट ऑफ स्पेन त्रिनिदादला तर दुसरा व तिसरा सामना सेंट किट्सला होणार आहे. चौथा व पाचवा सामना अमेरिकेतील लॉडरहील येथे होणार आहे.
भारतीय संघ – शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (अतिरिक्त यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, यजुवेंद्र चहल, अक्सर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, महंमद सिराज, अर्शदीप सिंग.
मालिकेचे वेळापत्रक –
एकदिवसीय सामने (सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्या. 7 वाजल्यापासून)
– पहिला सामना 22 जुलै पोर्ट ऑफ स्पेन
– दुसरा सामना 24 जुलै पोर्ट ऑफ स्पेन
– तिसरा सामना 27 जुलै पोर्ट ऑफ स्पेन
टी-20 सामने (सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्या. 8 वाजल्यापासून)
– पहिला सामना 29 जुलै त्रिनिदाद
– दुसरा सामना 1 ऑगस्ट सेंट किट्स
– तिसरा सामना 2 ऑगस्ट सेंट किट्स
– चौथा सामना 6 ऑगस्ट लॉडरहील, अमेरिका
– पाचवा सामना 7 ऑगस्ट लॉडरहील, अमेरिका