#INDvWI : दुस-या टी-२०साठी ‘असा’ आहे भारताचा ११ जणांचा संघ

तिरूवनंतपुरम : भारताने पहिल्या टी-२० सामन्यात कायरान पोलार्डच्या वेस्ट इंडिज संघाची कडवी झुंज परतवून लावत मालिकेतील पहिला सामना जिंकला. या लढतीत भारताच्या गोलंदाजीत आणि क्षेत्ररक्षणात अनेक चुका झाल्या. त्यामुळे दुस-या सामन्यात कर्णधार विराट संघात बदल करेल असं वाटत होते, पण कर्णधार विराटने संघात कोणताही बदल न करता मागील विजयी ११ जणांचा संघ कायम ठेवला आहे.

तत्पूर्वी विंडिजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारून भारतास फलंदाजीस पाचारण केले आहे.

दुसरीकडे वेस्ट इंडिजने दुस-या सामन्यात १ बदल केला आहे. यष्टीरक्षक रामदीनच्या जागी निकोलस पूरन याला संघात स्थान दिले आहे. हा सामना जिंकून मालिकेत आव्हान जिंवत ठेवण्याचे लक्ष्य विंडीजपुढे असणार आहे तर भारतीय संघाचा आजचा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याचा प्रयत्न असणार आहे.

भारतीय संघ : विराट कोहली ( कर्णधार) , रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेय्यस अय्यर, रिषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वाॅश्गिंटन सुंदर, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल.

वेस्टइंडिज संघ : कायरन पोलार्ड, एविन लुईस, लेंडन सिमन्स, ब्रँडन किंग, शिर्माॅन हेटमाएर, निकोलस पूरन, जेसन होल्डर, खॅरी पिएर, केस्रिक विल्यम्स, शेल्डन काॅट्रेल, हेल्डन वाॅल्श

Leave A Reply

Your email address will not be published.