हैदराबाद: कर्णधार विराट कोहलीच्या भारतीय संघाचा आज वेस्ट इंडिजशी 3 टी-20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना होत आहे. कर्णधार कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघात आजच्या सामन्यासाठी यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतलाच संधी देण्यात आल्याने संजू सॅमसनला अंतिम संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे पंतला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. शिखर धवन दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नसल्याने लोकेश राहुलला संधी मिळाली आहे. आजच्या संघात दोन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे. शमीला व कुलदीप यादवला संघात स्थान मिळाले नाही.
भारतीय संघ : विराट कोहली ( कर्णधार) , रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेय्यस अय्यर, रिषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वाॅश्गिंटन सुंदर, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल.
Here's the playing XI of the two squads #INDvWI #TeamIndia pic.twitter.com/POOmVdQg1c
— BCCI (@BCCI) December 6, 2019
दुसरीकडे विंडिजचा भरवशाचा फलंदाज निकोलस पूरन चार सामन्यांच्या बंदीमुळे खेळू शकणार नाही, त्याच्याऐवजी लेंडल सिमन्सला संधी देण्यात आली आहे.
वेस्टइंडिज संघ : कायरन पोलार्ड( कर्णधार), एविन लुईस, लेंडन सिमन्स, ब्रँडन किंग, शिर्माॅन हेटमाएर, दिनेश रामदिन, जेसन होल्डर, खॅरी पिएर, केस्रिक विल्यम्स, शेल्डन काॅट्रेल, हेल्डन वाॅल्श