#INDvWI 2nd T20 : नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा गोलंदाजीचा निर्णय

तिरूवनंतपुरम : पहिल्या टी-२० सामन्यात धमाकेदार विजय मिळवणारा भारतीय संघ आज तिरूवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरूध्द दुसरा टी-२० सामना खेळणार आहे. पहिल्या सामन्याप्रमाणे हा सामनाही जिंकून मालिका खिशात टाकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.

सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार असून तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल वेस्ट इंडिजच्या बाजूने लागला अाहे. वेस्ट इंडिज कर्णधार पोलार्डने प्रथम गोलंदाजी स्विकारून भारतीय संघास फलंदाजीस पाचारण केले आहे.

दुसरीकडे हा सामना जिंकून मालिकेत आव्हान जिंवत ठेवण्याचे लक्ष्य विंडीजपुढे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.