मुंबई – भारताचा नवोदित फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर याला खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे आगामी झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागणार आहे. त्याला तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) पाठवले जाणार आहे.
भारतीय संघ 18, 20 आणि 22 ऑगस्ट रोजी झिम्बाब्वेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतून नियमित कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, ऋषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे.
दरम्यान, दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त ठरलेल्या लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ झिम्बाब्वेला दाखल झाला असून लगेचच प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी नेटमध्ये सरावालाही प्रारंभ केला आहे.