जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात अडखळलेल्या भारतीय क्रिकेट संघाने कमबॅक केले आहे. भारताचा पहिला डाव 202 धावांत आटोपल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत दक्षिण आफ्रिकेला लागोपाठ धक्के दिले.
शार्दूल ठाकरने अचूक गोलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या तीन फलंदाजांना तंबुचा रस्ता दाखवला. तर मोहम्मद शमीने एक गडी बाद केला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची अवस्थात 4 बाद 110 अशी झाली होती. टेम्बा बवुमा आणि काईल व्हेरीयन प्रत्येकी 4 धावांवर खेळत आहेत. तर किगन पीटरसनने 62 धावा केल्या.
तत्पूर् भारतीय संघाचा पहिला डाव झटपट संपुष्टात आला. कर्णधार लोकेश राहुलचं अर्धशतक आणि रविचंद्रन अश्विनच्या 46 धावा वगळता, इतर फलंदाजांना सपशेल अपयश आलं. त्यामुळे भारताला पहिल्या डावात सर्वबाद 202 धावांपर्यंतच मजल मारता आली. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॅनसनने चार गडी बाद केले. तर कगिसो रबादा आणि डुआन ऑलिव्हर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.