गुवाहटी : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-२० क्रिकेट सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना गुवाहटी येथील बारसापारा स्टेडियमवर होणार आहे. भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना श्रीलंकेस प्रथम फलंदाजीस पाचारण केल आहे.
Captain @imVkohli has won the toss and elects to bowl first in the 1st @Paytm T20I against Sri Lanka.#INDvSL pic.twitter.com/V2a6ujWHrK
— BCCI (@BCCI) January 5, 2020
दुखापतीमुळे संघाबाहेर असलेले जसप्रीत बुमराह आणि शिखर धवन यांनी आजच्या सामन्याव्दारे भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. यष्टीरक्षक म्हणून पुन्हा एकदा रिषभ पंत याला संधी देण्यात आली आहे. दुखापतग्रस्त चहरऐवजी नवदीप सैनीला संधी मिळाली आहे.
भारतीय संघ : शिखर धवन, के एल राहुल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी
1st T20I. India XI: S Dhawan, KL Rahul, V Kohli, S Iyer, R Pant, S Dube, W Sundar, S Thakur, K Yadav, J Bumrah, N Saini https://t.co/I3IgAowJMC #IndvSL @Paytm
— BCCI (@BCCI) January 5, 2020
दुसरीकडे, लसिथ मलिंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंका संघ मैदानात उतरला आहे. श्रीलंकेने अनुभवी अँजलो मॅथ्यूजला भारत दौ-यासाछी पुन्हा बोलावले होते, मात्र आजच्या सामन्यात त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.
1st T20I. Sri Lanka XI: D Gunathilaka, WIA Fernando, MDKJ Perera, O Fernando, B Rajapaksa, D de Silva, D Shanaka, I Udana, W Hasaranga, L Kumara, L Malinga https://t.co/I3IgAowJMC #IndvSL @Paytm
— BCCI (@BCCI) January 5, 2020
श्रीलंका संघ : अविष्का फर्नांडो, दनुष्का गुणातिलाका, कुसल परेरा, ओशदा फ़र्नांडो, भानुका राजपकसा, धनंजया डी सिल्वा, दसुन शनाका, इसुरू उदाना, वाणिदु हसरंगा, लहिरू कुमारा, लसित मलिंगा (कर्णधार).