इंदूर – रेली रुसोचे ( Rilee Rossouw)नाबाद शतक, क्वांटन डिकॉकची अर्धशतकी खेळी व ट्रेस्टन स्टब आणि डेव्हीड मिलर यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील मंगळवारी झालेल्या अखेरच्या सामन्यात यजमान भारताविरुद्ध 20 षटकांत 3 बाद 227 असा धावांचा डोंगर उभा केला.
Innings Break!
South Africa post a formidable total of 227/3 on the board.
Scorecard – https://t.co/dpI1gl5uwA #INDvSA @mastercardindia pic.twitter.com/oiikTi69Vc
— BCCI (@BCCI) October 4, 2022
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदा फलंदाजी दिली. सलामीवीर कर्णधार टेम्बा बवुमा पुन्हा एकदा अपयशी ठरला. मात्र, दुसरीकडे डिकॉकने वेगाने धावा केल्या, त्याने रुसोच्या साथीत भारताच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 90 धावांची भागीदारी केली.
डिकॉक अर्धशतकानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात 68 धावांवर धावबाद झाला. त्याने आपल्या 43 चेंडूंच्या खेळीत 6 चौकार व 4 षटकार फटकावले. दरम्यान, रुसोनेही अर्धशतकी पल्ला पार केला. स्टबने डिकॉकला सुरेख साथ देत तिसऱ्या गड्यासाठी 87 धावांची भागीदारी करत संघाचे द्विशतक फलकावर लावले. स्टब 18 चेंडूत 2 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 23 धावा करून बाद झाला.
What a knock 💥
A hundred off just 48 balls from Rilee Rossouw 🙌#INDvSA | 📝 Scorecard: https://t.co/Za8J5e3abK pic.twitter.com/RnLm3UookP
— ICC (@ICC) October 4, 2022
रुसोने थाटात आपले शतक साकार केले. त्याला सुरेख साथ देत मिलरनेही वादळी खेळी केली. या जोडीने संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. मिलरने 5 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 19 धावा केल्या. शतकवीर रुसोने आपल्या नाबाद शतकी खेळीत अवघ्या 48 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 8 षटकारांची आतषबाजी केली. भारताकडून उमेश यादव व दीपक चहर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या सामन्यासाठी विराट कोहली व अर्शदीप सिंग यांना विश्रांती देण्यात आली होती.
संक्षिप्त धावफलक –
दक्षिण आफ्रिका – 20 षटकांत 3 बाद 227 धावा. (क्वांटन डिकॉक 68, ट्रेस्टन स्टब 23, रेली रुसो नाबाद 100, डेव्हीड मिलर नाबाद 19, उमेश यादव 1-34, दीपक चहर 1-48).