रांची – दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रीझा हेंड्रिक्स आणि ऍडन मार्कराम यांनी केलेल्या शतकीय भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका 278 धावांपर्यंत मजल मारत भारतासमोर विजयासाठी 279 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Innings Break!
South Africa post 278/7 on the board.
3⃣ wickets for @mdsirajofficial
1⃣ wicket each for @imkuldeep18, Shahbaz Ahmed, @Sundarwashi5 & @imShardOver to #TeamIndia batters now. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/6pFItKAJW7 #INDvSA pic.twitter.com/letjriOxaV
— BCCI (@BCCI) October 9, 2022
नाणेफेक जिंकूत प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेची सुरूवात निराशाजनक ठरली. सलामीवीर क्विंटन डिकॉक (5) आणि मलान (25) स्वस्तात माघारी परतल्याने त्यांची 10 षटकात 2 बाद 40 धावा अशी अवस्था होती. यानंतर ऍडन मार्कराम आणि रीझा हेंड्रिक्सने डाव सावरत मोठी भागीदारी केली. हेंड्रिक्सने आक्रमक खेळी करत अर्धशतक पूर्ण केले. यासोबत मार्करामने आपले अर्धशतक पूर्ण करत तिसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली.
मोहम्मद सिराजला अखेर ही जोडी फोडण्यात यश आले. त्याने हेंड्रिक्सला 74 धावांवर बाद केले. तर वॉशिंग्टन सुंदरने माक्ररमचा अडसर दुर केला. माक्ररमने 89 चेंडूत 79 धावांची खेळी केली. यानंतर डेव्हिड मिलर आणि पार्नेल खेळपट्टीवर आले. मात्र भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या 10 षटकात टिच्चून मारा केल्याने त्यांना 278 धावांपर्यत मजल मारता आली.
भारताकडून मोहम्मद सिराजने 38 धावांत 3 गडी बाद केले. तर वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, कुलदीप यादव आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.