सेंच्युरीयन – भारतीय संघाचा सातत्याने अपयशी ठरत असलेला मधल्या फळीतील तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजारा याच्या नावावर पुन्हा एकदा गोल्डन डकची नोंद झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच पहिल्या डावात पुजारा लुंगी एन्जीडीच्या गोलंदाजीवर शुन्यावर बाद झाला.
मयंक आग्रवाल बाद झाल्यानंतर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मात्र, पहिल्याच चेंडूवर तो शून्यावर बाद झाला व त्याच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदला गेला. तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेत दोन वेळा शून्यावर बाद होणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. तर कसोटी कारकीर्दीत शून्यावर बाद होण्याची त्याची नववी वेळ आहे.
इतकेच नव्हे तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी दिलीप वेंगसरकर 8 वेळा, राहुल द्रविड 7 वेळा शून्यावर बाद झाले आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून सुमार फॉर्ममध्ये असलेल्या पुजाराने 2021 साली 14 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 28.58 च्या सरासरीने केवळ 686 धावा असून त्यात 6 अर्धशतके आहेत.