मेलबर्न : पाकिस्तानने भारतासमोर 160 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत आठ गडी गमावून 159 धावा केल्या. पाकिस्तानकडून शान मसूदने 42 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचवेळी इफ्तिखार अहमदने 34 चेंडूत 51 धावा केल्या.
त्याचवेळी भारताकडून अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. हार्दिक पंड्याने 4 षटकांत 30 धावा देताना 3 गडी बाद केले तर अर्शदीप सिंगने 4 षटकांत 32 धावा देताना 3 गडी बाद केले. भूवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शम्मी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
Innings Break!
Three wickets apiece for @hardikpandya7 & @arshdeepsinghh and a wicket each for @BhuviOfficial & @MdShami11 as Pakistan post a total of 159/8 on the board.
Scorecard – https://t.co/X970NaDN4n #INDvPAK #T20WorldCup pic.twitter.com/Nypo6k5ZRn
— BCCI (@BCCI) October 23, 2022
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकातील पहिल्या चेंडूवर भारताचा गोलंदाज अर्शदीप सिंगने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला बाद केले. त्यानंतर अर्शदीपने भरात असलेल्या महंमद रिझवानचाही अडसर दूर केला. 2 बाद 15 अशा बिकट स्थितीतून शान मसुद व इफ्तेकार अहमद यांनी डाव सावरला व तिसऱ्या गड्यासाठी 76 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. या दोघांनीही आपापली अर्धशतके पूर्ण केली. मात्र, त्याचवेळी महंमद शमीने इफ्तेकारला बाद केले व ही जोडी फोडली.
इफ्तेकारने आपल्या 51 धावांच्या खेळीत 34 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार व 4 षटकार फटकावले. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करताना हार्दिक पंड्यानेही पाकिस्तानच्या प्रमुख फलंदाजांना बाद करत त्यांच्या धावसंख्येला लगाम लावला. पाकिस्तानच्या शादाब खान, हैदर अली, महंमद नवाज व असीफ अली यांनी साफ निराशा केली. डावातील अखेरच्या षटकांत मसुदने तळातील फलंदाज शाहिन शाह आफ्रीदी व हॅरीस रौफ यांना साथिला घेत संघाला दीडशतकी धावांपर्यंत मजल मारुन दिली.
आफ्रीदीने 16 तर हॅरीसने नाबाद 6 धावा केल्या. मसुदने आपल्या नाबाद 52 धावांच्या संयमी खेळीत 42 चेंडूत 5 चौकार फटकावले. भारताकडून हार्दिक पंड्या व अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. भुवनेश्वर कुमार व महंमद शमी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. पाकिस्तानचा डाव 20 षटकांत 8 बाद 159 असा रोखला गेला.
संक्षिप्त धावफलक –
पाकिस्तान – 20 षटकांत 8 बाद 159 धावा. (इफ्तेकार अहमद 52, शान मसुद नाबाद 52, शाहिन शाह आफ्रीदी 16, हॅरीस रौफ नाबाद 6, हार्दिक पंड्या 3-30, अर्शदीप सिंग 3-32, भुवनेश्वर कुमार 1-22, महंमद शमी 1-25).