मॅंचेस्टर- आज भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी मँचेस्टरच्या मैदानावर एकमेकांन समोर उभे आहेत. भारत- पाकिस्तानच्या या लढतीसाठी क्रिकेट फॅन्स देखील सज्ज झाले आहेत. या दोन्ही संघातील हा महामुकाबला पाहण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा मागे राहिले नाहीत. बॉलिवूड अभिनेता ‘रणवीर सिंग’ देखील हा सामना पाहण्यासाठी थेट मँचेस्टरच्या मैदानात हजार झाला आहे. दरम्यान, यावेळी रणवीरने भारतीय क्रिकेट संघांचे माजी खेळाडू हरभजन सिंग आणि विरेंद्र सेहवाग यांच्याशीही संवाद साधला आहे.
Look who gave a low down of the BIG CLASH between India & Pakistan LIVE from Old Trafford before the start of the game – @RanveerOfficial himself #TeamIndia #INDvPAK #CWC19 🇮🇳💙😎👌 pic.twitter.com/NaNKOY5YEw
— BCCI (@BCCI) June 16, 2019
सध्या रणवीर सिंग हिमाचल प्रदेश येथे आपल्या आगामी ’83’ या चित्रपटावर काम करत आहे. हा चित्रपट 1983 मधील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणा-या भारतीय संघावर आधारित आहे. रणवीर या चित्रपटामध्ये भारतीय संघांचे माजी ‘कर्णधार कपिल’ देव यांची भूमिका साकारत आहे.