नवी दिल्ली : टी-२० आणि एकदिवसीय मालिकेनंतर आता येत्या २१ फेब्रुवारीपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सुरू होत आहे.
या न्यूझीलंडविरूध्द कसोटी मालिकेसाठी भारतीय प्रमुख वेगवान गोलंदाज इशांत शर्मा पूर्ण तंदुरूस्त ठरला आहे. इंशातने तंदुरूस्ती चाचणी दिली होती, त्यात तो पूर्ण तंदुरूस्त ठरला आहे, त्यामुळे कर्णधार विराट कोहलीसह संघाला एक गुडन्यूज मिळाली आहे.
न्यूझीलंडविरूध्दच्या कसोटी मालिकेसाठी इशांतची भारतीय संघात निवड झालेली होती, मात्र त्याचा निर्णय तंदुरूस्तीवर अवलंबून होता. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) झालेल्या चाचणीमध्ये इशांतने सर्व निकष पार करत आपली तंदुरूस्ती सिध्द केली आहे.