वेलिंग्टन : आॅस्ट्रेलियाविरूध्दची एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौ-यावर जाणार आहे. या दौ-यात भारतीय संघ पाच टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.
यातील पाच टी-२० सामन्यांची मालिका २४ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२० दरम्यान होणार असून यासाठी न्यूझीलंड संघ जाहीर करण्यात आला आहे. दुखापतीमुळे न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट आणि ल्युकी फर्ग्युसन यांना टी-२० मालिकेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघात गोलंदाज हॅमिश बेन्नेटचा संघात समावेश करण्यात आला आहे. बेन्नेट जवळपास अडीच वर्षानंतर संघात पुनरागमन करणार आहे.
Hamish Bennett with media duties this morning at the @BasinReserve. The @wgtnfirebirds bowler getting set for the @SuperSmashNZ Grand Final on Sunday before joining the T20 squad to face India. #NZvIND pic.twitter.com/yzbjyhsOeI
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 15, 2020
न्यूझीलंडचा टी-२० संघ पुढीलप्रमाणे : केन विल्यमसन (कर्णधार),हॅमिश बेन्नटे, टाॅम ब्रुस, काॅलीन डीग्रँडहोम, मार्टीन गप्टील, स्काॅट, डार्ली मिचेल, काॅलिन मुर्नो, राॅस टेलर, ब्लर टिस्कनर, मिचेल सँटनर, टिम सेफर्ट, इश सोधी, टीम साउदी.