मुंबई : आगामी न्यूझीलंड दौ-यातील पाच सामन्यांच्या टी-२० क्रिकेट मालिकेसाठी रविवारी १६ सदस्यीय भारतीय संघाची निवड करण्यात आली. श्रीलंकेविरूध्दच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आलेल्या उपकर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज शमी यांचे पुनरागमन झाले असून यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला संघात स्थान मिळाले नाही.
भारत न्यूझीलंड दौ-यात एकूण दहा सामने खेळणार आहे. यामध्ये पाच टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांचा समावेश आहे. बीसीसीआयचे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत न्यूझीलंड दौ-यातील टी-२० मालिकेसाठीच फक्त संघनिवड करण्यात आली, मात्र कसोटी व एकदिवसीय मालिकेसाठी संघ निवडण्यात आलेला नाही.
India's T20I squad for NZ tour announced: Virat Kohli (C), Rohit Sharma (VC), KL Rahul, S Dhawan, Shreyas Iyer, Manish Pandey, Rishabh Pant (WK), Shivam Dube, Kuldeep Yadav, Yuzvendra Chahal, W Sundar, Jasprit Bumrah, Mohd. Shami, Navdeep Saini, Ravindra Jadeja, Shardul Thakur
— BCCI (@BCCI) January 12, 2020
टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वाशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर.