#INDvNZ 4th T20 : चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघात ३ बदल

वेलिंग्टन : न्यूझीलंडविरूध्दच्या पाच टी-२० क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-० अशी आघाडी घेतली आहे. आज मालिकेतील चौथा सामना होत असून न्यूझीलंड कर्णधार टीम साउदीने टाॅस जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास फलंदाजीस पाचारण केलं आहे.

मालिकेत विजयी आघाडी घेतल्यामुळे भारतीय संघाने आज संघात तीन बदल केले आहे. सलामीवीर रोहित शर्मा, रविंद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांना विश्रांती दिली असून त्याच्याऐवजी संजू सॅमसन, वाॅश्गिंटन सुंदर आणि वेगवान गोलंदाज नवदीप सैनी यांना संधी मिळाली आहे.

भारतीय संघ : संजू सैमसन, के एल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, युज़वेंद्र चहल, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह

दुसरीकडे मालिकेत सलग तीन पराभव पत्करल्यानंतर न्यूझीलंडने देखील संघात दोन बदल केले आहेत. न्यूझीलंडने काॅलिन डी ग्रैंडहोमच्या जागी टाॅम ब्रूस आणि केन विल्यमसन ऐवजी डेरिल मिचेल याचा संघात समावेश केला आहे.

न्यूझीलंड संघ : मार्टिन गप्टिल, कॉलिन मुनरो, डैरेल मिचेल, मिचेल सैंटनर, टॉम ब्रूस, रॉस टेलर, टिम सीफ़र्ट, टिम साउदी, ईश सोढ़ी, हेमिश बेनेट, स्कॉट कुग्गलिन

दरम्यान, भारताने तिस-या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवित पाच सामन्यांच्या  मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली असून उर्वरित दोन सामने जिंकून न्यूझीलंड संघास व्हाईटव्हाॅश देण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.