#INDvNZ 4th T20 : न्यूझीलंडने टाॅस जिंकला

वेलिंग्टन : न्यूझीलंडविरूध्दच्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आज मालिकेतील चौथा टी-20 सामना होत आहे.

सामन्यास थोडयाच वेळात वेलिंग्टन येथील स्काय स्टेडियमवर सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला टाॅस न्यूझीलंडने जिंकला आहे. न्यूझीलंड कर्णधार टीम साउदीने क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.

दरम्यान, न्यूझीलंडमध्ये भारताला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २००८-०९ व २०१९ साली अनुक्रमे २-० व २-१ अशी मालिका गमवावी लागली होती. त्याचा वचपा काढत भारतीय संघाने ही पाच सामन्याची मालिका सलग तिसराही सामना जिंकत अगोदरच खिशात घातली आहे, आता उर्वरित दोन सामने जिंकून न्यूझीलंडला व्हाइटवाॅश देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.