हॅमिल्टन : सलामीवीर रोहित शर्मा याच्या तडाखेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने तिस-या टी-20 क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडसमोर विजयासाठी १८० धावांचे आव्हान ठेवले आहे.
Innings Break!#TeamIndia post a total of 179/5 on the board. Over to the bowlers now.
Updates – https://t.co/7O8uUN3YGO #NZvIND pic.twitter.com/Mahv0yaW5l
— BCCI (@BCCI) January 29, 2020
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होते. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने २० षटकांत ५ बाद १७९ धावांची मजल मारली.
India finish on 179/5.
They scored 52 runs in their last five overs.
Can New Zealand save the #NZvIND series by chasing this down? pic.twitter.com/LROpQA9xPe
— ICC (@ICC) January 29, 2020
भारतीय संघाकडून रोहित शर्माने ४० चेंडूत (६ चौकार व ३ षटकार) सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली. त्यानंतर तिस-या क्रमांकावर फलंदाजीस आलेला शिवम दुबे खास कामगिरी करू शकला नाही. तो ३ धावा काढून बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीने ३८(२७), श्रेयस अय्यरने १७(१६) धावा केल्या. त्यानंतर मनीष पांडेने ६ चेंडूत नाबाद १४ आणि रवींद्र जडेजाने ५ चेंडूत नाबाद १० धावा करत २० षटकांत संघाची धावसंख्या १७९ वर नेली.
FIFTY for Rohit Sharma 🔥
The opener brings up his 20th T20I half-century with a maximum! Can he convert this into a big one?#NZvIND pic.twitter.com/sUnjgTZ8RW
— ICC (@ICC) January 29, 2020
न्यूझीलंड संघाकडून गोलंदाजीत हेमिश बेनेटने ४ षटकात ५४ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. मिचेल सैटनर आणि ईश सोढीने प्रत्येकी १ गडी बाद केला.