इंदूर : सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर धावांचा डोंगर उभारला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजयासाठी 386 धावांचे आव्हान दिले आहे. टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 385 धावा केल्या. टीम इंडियाकडून शुबमन गिल आणि कॅप्टन रोहित शर्मा या सलामी जोडीने शतकी खेळी केली.
Innings Break!
A mighty batting display from #TeamIndia! 💪 💪
1⃣1⃣2⃣ for @ShubmanGill
1⃣0⃣1⃣ for captain @ImRo45
5⃣4⃣ for vice-captain @hardikpandya7Over to our bowlers now 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/ojTz5RqWZf#INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/JW4MXWej4A
— BCCI (@BCCI) January 24, 2023
न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला पहिल्यांदा फलंदाजी दिली. मात्र भारताचा कर्णधार रोहित शर्मा व सलामावीर शुभमन गिल यांनी आक्रंमक फलंदाजी करत लॅथमचा निर्णय साफ चुकीचा ठरवला. या जोडीने न्यूझीलंडच्या संमिश्र गोलंदाजीची वाताहत केली.
या दोघांनी संघाचे शतक तसेच द्विशतकही फलकावर लावले. तसेच अर्धशतकी पल्ला पार करताना आपापली शतकेही साकार केली. त्यानंतर मात्र हे दोघेही पाठोपाठ बाद झाले. रोहितने आपल्या 101 धावा करताना 85 चेंडूंचा सामना करताना 9 चौकार व 6 षटकार फटकावले. गिलने ही 112 धावांची खेळी करताना 78 चेंडूत 13 चौकार व 5 षटकार फटकावले.
त्यानंतर विराट कोहलीने थोडी चमक दाखवली मात्र, स्थिरावल्यावरही तो अनावश्यक फटका मारुन 36 धावांवर बाद झाला. इशान किशन 14, सूर्यकुमार यादव 14, वॉशिंग्टन सुंदर 9 यांनीही निराशा केली. मात्र, त्याचवेळी हार्दिक पंड्याने शार्दुल ठाकूरला साथीला घेत संघाला त्रिशतकही धावांपेक्षाही जास्त मोठी मजल मारून दिली.
शार्दुलने 25 धावांच्या खेळीत 17 चेंडूत 3 चौकार व 1षटकार फटकावला. पंड्याने 54 धावांच्या खेळीत 38 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 3 षटकार फटकावले. भारताने 50 षटकात 9 बाद 385 धावा उभारल्या. न्यूझीलंडकडून ब्लेअर टीकनर व जेकब डफी यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
भाजपचे कथित ‘ऑपरेशन लोटस’ वैध ठरवण्यासाठी ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ हा प्रस्ताव
संक्षिप्त धावफलक – भारत – 50 षटकांत 9 बाद 385 धावा. (शुणबन गिल 112, रोहित शर्मा 101, हार्दिक पंड्या 54, विराट कोहली 36, शार्दुल ठाकूर 25, ब्लेअर टीकनर 3-76, जेकब डफी 3-100).