आॅकलंड : काॅलिन मुनरो, केन विलियमसन आणि राॅस टेलर यांच्या तडाखेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात भारतासमोर विजयासाठी २०४ धावांचे आव्हान ठेवले आहे.
Half centuries from Munro, Williamson and Taylor power the team to 203/5 at @edenparknz. Chase coming up shortly!
Live Scoring | https://t.co/OQFuu9tlLr#NZvIND #CricketNation pic.twitter.com/mkJyIoZf6B
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 24, 2020
कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना न्यूझीलंड संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ५ बाद २०३ धावा केल्या.
Innings Break!
Half-centuries from Munro, Williamson and Taylor propel New Zealand to a total of 203/5 after 20 overs.#TeamIndia chase coming up shortly.
Live – https://t.co/5NdtfFJOd8 #NZvIND pic.twitter.com/G0DEqeJGZG
— BCCI (@BCCI) January 24, 2020
न्यूझीलंडकडून काॅलिन मुनरो याने ४२ चेंडूत (६ चौकार व २ षटकार) ५९, केन विलियमसनने २६ चेंडूत (४ चौकार व ४ षटकार) ५१, राॅस टेलरने २७ चेंडूत (३ चौकार व ३ षटकार) नाबाद ५४ आणि मार्टिन गप्टिलने १९ चेंडूत (४ चौकार व १ षटकार) ३० धावांची खेळी केली.
Fifty and out!
Kane Williamson falls after scoring a blazing 26-ball 51. #NZvIND pic.twitter.com/3z5QQ5B3G0
— ICC (@ICC) January 24, 2020
भारतीय संघाकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने ४ षटकात ३१ धावा देत १, युझवेंद्र चहलने ४ षटकांत ३२ धावा देत १, शार्दुल ठाकूरने ३ षटकात ४४ धावा देत १, शिवम दुबेने ३ षटकात २४ धावा देत १ आणि रविंद्र जडेजाने २ षटकात १८ धावा देत १ गडी बाद केला. तर मोहमद शम्मीला एकही गडी बाद करता आला नाही, त्यानी ४ षटकात ५३ धावा दिल्या.