लंडन – एकीकडे इंग्लंड संघाच्या चाहत्यांनी भारतीय प्रेक्षकांवर वर्णद्वेषी टीका केली, तर दुसरीकडे याच प्रकरणाची चौकशी करून कारवाईचा इशारा देणारे इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळही (ईसीबी) भारतीय संघाची टर उडवण्यात मागे नसल्याचेच चित्र दिसले.
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सातत्याने अपयशी होत असून, याही कसोटीत त्याला मोठी खेळी करता आली नव्हती. कोहलीच्या याच अपयशावर मंडळाने तोंडाला चेन लावलेली इमोजी पोस्ट केली असून जणू कोहलीला तोंड बंद ठेव असेच सुनावले आहे.
— England Cricket (@englandcricket) July 5, 2022
इंग्लंडच्या डावात शतक साकार केलेल्या जॉनी बेअरस्टो याच्याशी कोहलीचा वाद झाला होता व कोहलीने त्याला तोंड बंद ठेवण्याचा इशारा दिला होता, आता तसाच इशारा इंग्लंड मंडळाने कोहलीला दिला आहे.