#INDvENG : तंदुरुस्त ठरला तरच उमेशची संघात निवड

अहमदाबाद  – भारत व इंग्लंड यांच्यातील उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज उमेश यादवचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, त्यापूर्वी त्याला तंदुरुस्ती चाचणीत आपली तंदुरुस्ती सिद्ध करावी रलागणार आहे. येत्या बुधवारपासून तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे.

उमेश यादवने तंदुरुस्ती चाचणी यशस्वी केली तरच त्याला संघात स्थान मिळेल. सामन्यापूर्वी सोमवारी उमेशची तंदुरुस्ती चाचणी होणार आहे. स्नायूंच्या दुखापतीमुळे उमेश यादव ऑस्ट्रेलियात कसोटी सामन्याला मुकला होता.

भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक आग्रवाल, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे (उपकर्णधार), लोकेश राहुल, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, महंमद सिराज, उमेश यादव, जसप्रीत बुमराह.
राखीव खेळाडू – के. एस. भरत, राहुल चहर.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.