पुणे – भारतीय संघात मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन केलेल्या सलामीवीर शिखर धवनला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक पूर्ण करण्यात अपयश आले. तो या सामन्यात 98 धावांवर बाद झाला. एकदिवसीय सामन्यांत धवन सहाव्यांदा नर्व्हस नाइंटीचा बळी ठरला आहे.
सलामीवीर हिटमॅन रोहित शर्मा बाद झाल्यानंतर धवनने कर्णधार विराट कोहलीच्या साथीत संघाचा डाव सावरणारी खेळी केली. तसेच आक्रमक फलंदाजी करत त्याने शतकाचीही संधी निर्माण केली. मात्र, बेन स्टोक्सच्या स्लोअरवन चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनकडे त्याने सोपा झेल दिला व बाद झाला. त्याने आपल्या 105 चेंडूत 11 चौकार व 2 षटकार फटकावले.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये धवन सहा वेळा नर्व्हस नाइंटीचा बळी ठरला आहे. इंग्लंडविरुद्धचा हा सामना धवनच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील 140 वा सामना होता.